Ad will apear here
Next
‘राज्यात सोलापूर जिल्ह्याची विशेष छाप’
पुण्यात आयोजित ‘सोलापूर फेस्ट’मध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन


पुणे : ‘राज्यात अनेक जिल्ह्यांपैकी सोलापूर शहर, जिल्हा अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. खास करून सोलापूरची खाद्य संस्कृती माझ्यासारख्या माणसाला आवडते. सोलापूरचे वस्त्रोद्योग जगभर प्रसिद्ध आहेत. मी प्रत्यक्ष सोलापूर पाहिले असून, सोलापूरची अनेक वैशिष्ट्ये पाहता यातून सोलापूरची श्रीमंती दिसून येते. म्हणून राज्यात सोलापूर जिल्ह्याची आपली अशी विशेष छाप आहे,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

सोलापूर जिल्ह्यातील वस्तूंना जिल्ह्याबाहेर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे पुण्यातील पंडित फार्म्स येथे आयोजित केलेल्या ‘सोलापूर फेस्ट २०१८’चे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ‘श्रीमंती सोलापूरची’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राचे  सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, गुरुबाबा महाराज औसेकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे तथा सोलापूर सोशल फाउंडेशनचे संचालक अभिजित पाटील, पूर्वा वाघमारे, सल्लागार प्रा. देवानंद चिलवंत, नरेंद्र काटिकर, उद्योजक प्रमोद साठे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.  

‘सोलापूर फेस्ट’च्या माध्यमातून पुण्यातील नागरिकांना सोलापुरी उत्पादनांची खरेदी करता येणार आहे, तसेच अस्सल सोलापुरी चवीच्या खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. प्रदर्शनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. ‘सोलापूर फेस्ट’मध्ये १०० दालने असून, सोलापूरची चादर, शेंगा चटणीपासून महिला बचत गटाच्या अनेक वस्तू, रेडिमेड कपडे, सेंद्रिय उत्पादने यांसह चित्रकारांच्या कला दालनांचा समावेश आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZRWBU
Similar Posts
सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे मेळाव्याचे आयोजन पुणे : सोलापूर जिल्यात ओढवेलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे पुण्यातील सोलापूरकरांचा मेळावा १६ डिसेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आला आहे. डीपी रोड येथील पंडित फार्मस् येथे सकाळी १० वाजता हा मेळावा होईल. यात सहकारमंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहून सोलापूरकरांशी संवाद
‘सर्व माध्यमांमध्ये सकस आणि दर्जेदार लेखन व्हायला हवे’ पुणे : ‘समाजमाध्यमांमुळे वाचनसंस्कृतीचे स्वरूपही बदलत आहे. हा बदल सकारात्मक आणि समाजाला दिशा देणारा असला पाहिजे. त्यासाठी सर्वच प्रकारच्या माध्यमांमध्ये सकस आणि दर्जेदार लेखन व्हायला हवे,’ अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी मुंबई : मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील पाच हेक्टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळून शहरातील वाहतूकीची समस्या दूर होणार आहे. यासाठी पुणे शहरातील
‘पंतप्रधानांनी देशातील राजकीय कार्यसंस्कृती बदलली’ पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपूर्ण राजकीय कार्यसंस्कृती बदलली आहे. यापूर्वी निर्णय न घेणे हाच मोठा निर्णय आणि धोरणलकवा हीच देशाची अवस्था होती. ‘गरिबी हटाओ’चा नारा देऊन लोक कित्येक निवडणुका जिंकले; पण गरिबांसाठी कधीच काम केले नाही. मोदींनी आणलेल्या कार्यसंस्कृतीत देशातील गरिबाच्या जीवनात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language